Ad will apear here
Next
‘खेळाडूंनी स्वत:च्या गुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करावे’
गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर यांचे प्रतिपादन


गडचिरोली : ‘आदिवासी विकास विभागांतर्गत दर वर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.  विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागील शासनाचा मुख्य हेतू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक काटकपणा, धैर्य, चिकाटी हे क्रीडापूरक गुण उपजतच असतात. मागील वर्षी आपल्या जिल्ह्यात विभागीय क्रीडा संमेलन झाले. आता राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होत आहेत. विभागातील सर्व आदिवासी खेळाडूंनी आपल्यातील क्रीडा गुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करावे व विभागाचे नाव गौरवान्वित करावे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष येागिता भांडेकर यांनी केले.

आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा संमलनाचे आयोजन गडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन २९ जानेवारी २०१९ ला जिल्हा परिषद अध्यक्ष भांडेकर यांचे हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.



आदिवासी आयुक्त डॉ. किरण कुळकर्णी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरचे अप्पर आयुक्त ऋषिकेश मोडक, अमरावतीचे अप्पर आयुक्त प्रदीप चंद्रन, जिल्हाधिकारी शेखर सिंह, उपआयुक्त केशव बावनकर, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, इंदुराणी जाखड, नगराध्यक्ष योगिता पिपरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गर्ग, भंडाराचे सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णा पांचाळ, चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुम्बेटकर, कृषी सभापती नाना नाकाडे आदी मान्यवर उपस्थित होते.



या तीन दिवसीय क्रीडा संमलनात ठाणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर विभागांतील दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यामध्ये १४, १७ व १९ वयोगटांतील मुला- मुलींचे कबड्डी, खो-खो, व्हालीबॉल आदी सांघिक खेळांसह विविध वैयक्तिक खेळांचे आयोजन केले आहे.

उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रकल्पातील खेळाडूंनी सादर केलेल्या झांकी प्रमुख आकर्षण ठरल्या. या झांकीतून समाजाला दिशा देणारे संदेश देण्यात आले. या वेळी गडचिरोली प्रकल्पातील रेला नृत्य विशेष आकर्षण ठरले होते. तसेच येथे भंगडा नृत्य सादर करण्यात आले.



जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात २०१८-१९मध्ये पहिल्यांदाच राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यामुळे राज्यातील विविध भागांतून आलेल्या विद्यार्थी, कर्मचारी तसेच क्रीडाप्रेमींना येथील संस्कृती, क्रीडा कौशल्य, समाजजीवन या विषयी माहिती मिळणार आहे.

नागपूरचे अप्पर आयुक्त मोडक यांनी प्रास्ताविक केले. अनिल सोमनकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ओंबासे यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZFMBW
Similar Posts
चंद्रपूरचे विद्यार्थी निघाले महाराष्ट्र दर्शनाला नागपूर : आदिवासी विकास विभाग व महाराष्ट्र पोलिसांमार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजनेंतगर्त चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची पहिली सहल महाराष्ट्र दर्शनाला निघाली आहे. या सहलीची सुरुवात नागपूरपासून झाली
पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी ४४ हजार ईव्हीएम, २० हजार व्हीव्हीपॅट यंत्रे सज्ज मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदारसंघामध्ये ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान होत आहे. आठवडाभरावर आलेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण ११६ उमेदवार आहेत. सात मतदारसंघात १४ हजार ९१९ मतदान केंद्रे आहेत, तर एक कोटी ३० लाख ३५ हजार मतदार आहेत
वैराटगडावर स्वच्छता मोहीम गडचिरोली : सह्याद्री प्रतिष्ठानच्या चंद्रपूर विभागाच्या वतीने १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील किल्ले वैराटगडावर दुर्गसंवर्धनदिन साजरा करण्यात आला. गडावरील प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. सह्याद्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिलीप रिंगणे यांनी या मोहिमेबद्दल माहिती दिली
नागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी ‘करू या देशाटन’च्या गेल्या काही भागांत आपण विदर्भसौंदर्य पाहत आहोत. आजच्या भागात फेरफटका मारू या नागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी आणि आसपासच्या काही पर्यटनस्थळांवर...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language